
शासकीय काेव्हिड रूग्णालयातील रेमडेसीवीर इंजेक्शनचा प्रश्न मार्गी लागणार, आता टेंडर निघाले
रत्नागिरी शासकीय रूग्णालय हे कोविड रूग्णालय बनविण्यात आले असून या ठिकाणी जिल्ह्यातील गंभीर कोरोना रूग्णांना उपचारासाठी आणण्यात येते व येथे उपचार केले जातात. कोरोनाच्या गंभीर रूग्णावर रेमडेसीवीर हे इंजेक्शन प्रभावी ठरत आहे.
मात्र रत्नागिरी जिल्ह्यात कोविड रूग्णालयात ही इंजेक्शन नसल्याने रूग्णांनाच ही इंजेक्शने बाहेरून आणण्यास सांगण्यात येत होते. याबाबत काल वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आता काल इंजेक्शन मागविण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर आता टेंडरद्वारे पुरवठादार निश्चित करण्यात आला असून त्याला या इंजेक्शनचा पुरवठा करण्यास सांगण्यात आले असून येत्या दोन दिवसात ही इंजेक्शन कोविड रूग्णालयात उपलब्ध होतील असे कळते. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्ण मिळत असताना व मृत्यू पावणार्या रूग्णांची संख्या २८ वर गेली असताना देखील ही इंजेक्शन या ठिकाणी आतापर्यंत उपलब्ध नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
konkantoday.com