वाळू उत्खननाला बंदी असतानाही चिपळूण शहरात वाळूचे ढिगारे, महसूल विभागाचे दुर्लक्ष.
वाळू उत्खननाला बंदी असतानाही सध्या शहरात ठिकठिकाणी वाळूचे मोठमोठे ढिगारे दिसून येत आहेत. त्यामुळे ही बेकायदा वाळू नेमकी कोठून येते असा प्रश्न अनेकाना पडला असून दिवसाही वाळूची वाहतूक होत असताना महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या वाळूचा दर चढा असल्याने ती केवळ बांधकाम व्यावसायिकच खरेदी करीत असल्याची चर्चा सुरू आहे.गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र वाळू उत्खनन व वाहतुकीला बंदी आहे.
असे असताना करंबवणे खाडीत काही अधिकार्यांच्या आशीर्वादाने १५ सक्शन पंपाद्वारे दिवस-रात्र वाळू उत्खनन सुरू होते. याची माहिती जिल्हा खनिकर्म विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी येथील मंडल अधिकारी, तलाठी यांच्या मदतीने काही सक्शन पंप फोडण्याची धडक कारवाई केली तर अनेकजण पंप घेवून पळून जाण्यात यशस्वी झाले.
मात्र ही कारवाई जिल्हास्तरावरील अधिकार्यांकडून झाल्याने संबंधित अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी नेमके काय करतात असा प्रश्न उपस्थित झघला होता. तर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांनी चिपळूण, शिरळ मंडल अधिकारी, संबंधित तलाठी यांच्यावर कारवाई करण्याची लेखी मागणी केली आहे.www.konkantoday.com