
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे जेष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे यांचे दुख:द निधन
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे जेष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे यांचे आज दुपारी लोटलीकर हॉस्पिटल येथे दुख:द निधन झाले.गेले काही दिवस कुमार शेट्ये यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर डॉ. लोटलीकर हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते.कुमार शेट्ये यांनी आधी कांग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी कांग्रेस मधे काम केले. ते रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती होते.
देशाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून संपूर्ण राज्यात परिचित होते. राष्ट्रवादी मधे फूट पडल्यानंतरही ते शरद पवार गटात कार्यरत होते.प्रत्येक पक्षात त्यांचे चांगले सलोख्याचे संबंध होते.