
चिपळुणातील व्यापारी संकुलातील गाळ्यांना कुलूप.
चिपळूण शहरातील शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याशेजारी असणार्या शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर या व्यापारी संकुलातील गाळे अनेक दिवस बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. हे गाळे वापराविना बंद असल्याने नगर पालिका प्रशासनाने मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते सचिन शेट्ये यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
त्यामुळे बुडणारा महसूल वाचविण्यासाठी बंद असलेले गाळे महिला बचत गट, नवीन छोटे व्यावसायिक यांच्यासाठी खुले करून द्यावेत, अशी मागणी करीत त्यांनी या विषयाकडे नगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
चिपळूण नगर पालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील शंकरवाडीकडे जाणार्या रस्त्यालगत एल टाईप शॉपिंग सेंटरची इमारत उभी केली. या इमारतीचे काही वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर असे नामकरण्यात आले आले. या इमारतीतील गाळे भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. मात्र गेली कित्येक दिवस येथील गाळे बंद असल्याचे दिसून येत आहे.www.konkantoday.com