
खेड तालुक्यातील गोहत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे.
खेड तालुक्यातील खारी-देवणं पुलानजिक सलग दोन दिवस गोवंशसदृश जनावरांचे अवशेष आढळल्यानंतर गोहत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार संशयितांना अटक केली आहे. लवकरच मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात यश येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान घटनेपासून तणावपूर्ण झालेले वातावरण हळुहळू निवळत असून शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.www.konkantoday.com