हातखंबा झरेवाडी येथे चौपदरीकरणाच्या ब्रीज वरून 100 फूट खोल चरात कोसळून दुचाकीस्वार गंभीर जखमी.
मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा झरेवाडी येथे चौपदरीकरणाच्या ब्रीज वरून 100 फूट खोल चरात कोसळून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आझाद अन्सारी (19, बिहार) असे गंभीर जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.अन्सारी हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच 08 यु 6777) वरून पालीच्या दिशेने जात होता. यावेळी त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो ब्रीज वरून थेट 100 फूट चरात कोसळला.
सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर अन्सारी बेशुद्धावस्थेत होता. त्याला सकाळी नागरिकांनी पाहिल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रिजच्या खाली खणलेल्या चरात त्याची दुचाकी आदळल्याने तो गंभीर जखमी झाला. मंगळवारी सकाळी नागरिकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु तो बेशुद्ध असल्याने त्याला आता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.