
स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त रत्नागिरी ते पावस सायकल दिंडी.
स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘रत्नागिरी सायकलिस्ट क्लब’ने सलग तिसऱ्या वर्षी सायकल दिंडी उत्साहात काढली. यामध्ये लहान मुलांनीही सहभाग घेतला.
सायकल चालवूया’, ‘प्रदूषण टाळूया’, ‘पर्यावरण जपूया’, ‘तंदुरुस्त राहूया’, असा संदेश या दिंडीद्वारे देण्यात दिला. यात क्लबचे सायकलस्वार सदस्य सहभागी झाले. ‘ओम राम कृष्ण हरि’ नामगजर करत ३७ कि.मी.ची ही दिंडी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.