समुद्रकिनारी येणार्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक मच्छिमारांची मदत घेतली जाणार -धनंजय कुलकर्णी.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनार्यावर लाखो पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक मच्छिमारांची मदत घेणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी खेडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच महिलांची छेडछाड झाल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. नवीन वर्ष आनंदात आणि सुरक्षितेत साजरा करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनार्यावर दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणी दाखल होतात.
सर्व पर्यटकांची सुरक्षा हा जिल्हा प्रशासनाचा महत्वाचा मुद्दा असून कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच समुद्रात पोहण्यासाठी व आनंद साजरा करण्यासाठी गेल्यानंतर पाण्यात बुडण्यासारखे प्रकार होवू नयेत, त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव स्थानिक मच्छिमारांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.www.konkantoday.com