शुक्रवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा व खरेदीदार-विक्रेता संमेलन
रत्नागिरी दि.26 :- जिल्हास्तरीय कार्यशाळा व खरेदीदार-विक्रेता संमेलन (बायर सेलर मिट) आयोजित आलेले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमइ) योजनेंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थी, खरेदीदार विक्रेते व शेतकरी या महत्वाच्या घटकांना एकाच मंचावर आणून योजनेला चालना मिळण्यासाठी विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता कै. श्यामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे कार्यशाळा आयोजित केलेली आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी कळविले आहे.