
वेरळ घाटात कंटेनर पलटला.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वेरळ घाटामध्ये बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास एक डिझेलवाहू टँकर पलटी झाला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, महामार्गावरील अवघड वळणाचा अंदाज न आल्यामुळे कंटेनर महामार्गाच्या मधोमध कलांडल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.मात्र, हातखंबा येथील महामार्ग पोलिस व लांजा पोलिस यांच्या अथक प्रयत्नानंतर तीन तासानंतर या कंटेनरला बाजूला करण्यात यश आले.