
कामथेच्या रेल्वे जागेचा मोबदला मिळणार*
__चिपळूण तालुक्यात कामथे खुर्द येथील ३५ शेतकर्यांची जमीन रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वेसाठी संपादित केली होती. यास १७ वर्षे पूर्ण झाली तरी कोकण रेल्वे प्रशासनाने अद्याप एकही रुपयाचा मोबदला जमीन मालकांना दिलेला नाही. मात्र आता कोकण रेलवे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांच्या प्रयत्नाने हा मोबदला महिनाभरात मिळणार असल्याची माहिती भूधारक व माजी उपसभापती अनंत हरेकर यांनी दिली.www.konkantoday.com




