मी कधीच मला उद्योग विभागच पाहिजे अशी मागणी कधी केली नव्हती- उदय सामंत.

महायुतीच्या खातेवाटपानंतर आणि काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. शिंदे गटातील काही मंत्र्यांनी मात्र जुनी खाती मिळवण्यात यश मिळालं आहे.यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय उद्योगमंत्री उदय सामंत आघाडीवर (Uday Samant) आहेत. आता सामंत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून ज्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आरोग्य विभागाबाबत एकनाथ शिंदेंनी मला विचारलं होतं असा खुलासा उदय सामंत यांनी केला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोग्य मंत्रालयाबाबत मोठे वक्तव्य केले. शिवसेनेकडे बांधकाम विभाग, नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री ही महत्वाची खाती आली आहेत. तसेच मागील सरकारमध्ये असलेली जुनी खाती पुन्हा शिवसेनेला मिळाली आहेत. परंतु, कोणतं खातं कु्णाला मिळणार याची उत्सुकता होती. उदय सामंत यांना पु्न्हा उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली. यानंतर मंत्री उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आरोग्य मंत्रालयावरून मोठे वक्तव्य केले.माझ्याकडे आरोग्य मंत्रालय येणार अशा बातम्या पंधरा दिवसांपू्र्वी माध्यमांत आल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मला याबाबत विचारलं होतं. ज्या पद्धतीने आपण उद्योग विभाग चालवला त्याच पद्धतीने राज्याचा आरोग्य विभाग चालवावा अशी सूचना त्यांनी मला केली होती.

मी कधीच मला उद्योग विभागच पाहिजे अशी मागणी कधी केली नव्हती. सर्वसामान्य माणसांचं आरोग्य सुधारण्याची जबाबदारी जर माझ्यावर येत असेल तर मी ही जबाबदारी हसत हसत स्वीकारेन. यात काळजी करण्याचं काही कारण नाही. ठीक आहे तो राजकारणाचा भाग आहे. आरोग्य मंत्रालय काही माझ्याकडे आलं नाही असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button