मालवण तालुक्यात चौके येथे घराला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू.

मालवण तालुक्यातील चौके – स्थळकरवाडीतील घराच्या पडवीला मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत येथे वास्तव्यास असलेले घरमालक दीपक सखाराम परब-बावकर (वय 55) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.मयत दीपक परब-बावकर हे गावात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. गेली अनेक वर्षे ते पत्नी व मुलांपासून अलिप्त घराच्या मागील पडवीत राहत होते. मंगळवारी रात्री ते नेहमीप्रमाणे घरात झोपी गेले असताना अचानक घराच्या मागील पडवीला आग लागली. यावेळी शेजारील मंडळींंनी पडवीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलामात्र दरवाज्याला आतमधून कडी असल्यामुळे दरवाजा उघडता आला नाही.

दरम्यान, आगीने मोठा पेट घेतल्याने पडवीतून आगीचे मोठ मोठे लोळ येत होते. यावेळी दीपक यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. आग आटाक्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर मालवण पालिका अग्निशमन दलाला कळवून अग्निशामक बंब बोलवून घेतला आग विझवली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button