नारळाच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या नेपाळी गुरख्याचा मृत्यू.
नारळाच्या उंच झाडावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या त्या नेपाळी गुरख्याचा अखेर कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना साटवली भंडारवाडी येथे घडली होती.राजापूर तालुक्यातील दसुर येथील काझी नामक व्यक्तीकडे गोविंद थापा नावाचा हा नेपाळी गुरखा त्यांच्या बागेत कामाला होता. तो १६ डिसेंबर रोजी साटवली येथील दूध डेअरीवर दूध घालण्यासाठी आला होता. यावेळी साटवली भंडारवाडी येथील एका व्यक्तीने त्याला नारळाच्या झाडावर नारळ काढण्यासाठी चढवले होते
.मात्र तोल जाऊन त्याचा उंच झाडावरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने प्रथम लांजा आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते .मात्र या ठिकाणी त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला कोल्हापुर येथील सिपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .या ठिकाणी उपचार सुरू असताना अखेर या नेपाळी गुरख्याचा मृत्यू झाला आहे.