“दूरदृष्टीचे आणि कर्त्तव्यसृष्टीचे ना. मा. श्री. उदय स्वरुपा रविंद्र सामंत…!”
संधीच्या ‘दिशा’ आणि फुलणाऱ्या कर्त्तृत्वाचा ‘उदय’ जेव्हा होतो, तेव्हा सलग पाचव्यांदा लोकशाहीच्या प्रांगणात श्री. रविंद्र सामंत यांच्या सुपुत्राला घवघवीत चढत्या क्रमांकात ‘यश’ मिळतं. दोनदा उद्योग मंत्री पदाची माळ त्यांच्या ‘सुयशाला’ झळाळती ठेवते. दूरदृष्टी, कर्त्तव्यसृष्टीला मग ‘जाणते नेत्तृत्व’ श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितजी पवार आणि आपले पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी सर त्यांच्या कर्त्तृत्वाच्या नेत्तृत्वाला आणि सुसंवादी वक्तृत्वाला संधी देतात. मा. श्री. उदय स्वरुपा रविंद्र सामंत मग महाराष्ट्राच्या दोन ‘अस्मितादर्शक’ जबाबदाऱ्या स्विकारतात.
एक त्यातलं उद्योगमंत्री पदत्त्व आणि दुसरं अस्मिता वाहक महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या मंत्रालयाचं नेतृत्व, त्यांच्या गळयात जबाबदारीची माळा घालतात. या दोन्ही जबाबदाऱ्यांसह सहसा त्या त्या भागातील जाणकार आणि अनुभवी नेतृत्वाला ‘पालकमंत्री’ पद सर्वांगिण विचार करून देण्यात येतं. कारण यात संवादी शासनाचं प्रतिनिधीत्त्व असतं. ते त्या भागातील संवेदना हाणि सर्व सामान्य जणांच्या गरजांना एक पूरक संवाद असतो. प्रतिबिंब असतं. जनतेची कामे यशस्वी करण्याचा हा एक राजमार्ग असतो. ‘जेष्ठत्व’ हे केव्हाही ‘अनुभवाची’ भाषा कथन करते. रत्नागिरी जिल्ह्यात ना. योगेश कदम हया सर्व गोष्टी समजतात. त्यांना कार्यरथ पुढे करायचा आहे. म्हणून त्यांचा पाठिंबा श्री. उदय सामंत यांना आहे. त्यांना पालकमंत्रीपद मिळावे, जनतेचा ‘आवाज’ त्यात त्यांच्या कर्त्तृत्वाचा ‘साज’ झळाळता रहावा आणि आपलं कोकण पर्यायाने महाराष्ट्राची ‘निसर्ग सौंदर्य’ खाण जपल्या जावी हीच सदिच्छा…!
बौद्धिक क्षमता आणि भावनिक क्षमता यांचा बुध्यांक (Intelligence Quotient and Emotional Quotient) हे समाजकारणी, राजकारणी आणि नेत्तृत्ववाहीनी यासाठी फार आवश्यक असतो. श्री. उदय सामंत यांच्या बाबतीत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेताना हे जाणवतं – त्याचं ‘कर्तृत्व’, नेतृत्व आणि वक्तृत्व याला जो दूरदृष्टीचा (Vision Fullness) आणि ‘असेच करायला हवे’ याचा (Mind Fullness) याचा जो परिस स्पर्श आहे, तो राज्याच्या, समाजाच्या, देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय सामजंस्याच्या हिताचा असतो. ते आपल्या लोकाभिमुख सभेतून सर्वांशी प्रेमानेच बोलतात. शब्द जपून वापरतात. आपल्या सोबतच्या राजकारण्यांना, कार्यकर्त्यांना आणि सर्व सामान्य गरजू लोकांना खूप संभाळून घेतात. त्यांच्या समस्यांना पदाच्या मर्यादा सांभाळून न्याय देण्याचा प्रयत्न करतात. माझ्या क्लिनिक मध्ये आणि जनसंपर्कात बोलताना त्यांच्या बद्दलच्या या भावना समाजाच्या प्रगतीच्या कदाचित पायऱ्याही असतात. प्रेम भाव, आदर भाव जपणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
मी माझ्या या ‘व्यक्ती वेध’ लेखाच्या सुरवातीस म्हटलं आहे. त्यांच्या ‘कर्त्तृत्वाचा उदय’ तर त्याबद्ल मी काही जास्त सांगायला नको, तरीही पर्यावरणपूरक, प्रदूषणविरहीत पण युवा पिढीचा दृष्टीकोन पुढे ठेवून त्यांचा रोजगार हा विषय महत्वाचा वाटतो. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ३० हजार कोटींचा डिफेन्स आणि सेमी कंडक्टर हे प्रकल्प आणले. साधारण २९ हजार तरुणांना यातून कदाचित रोजगार मिळेल. ‘डावोस करार’ हा ही महत्वाचा करार आहे. त्यांना आपल्या महाराष्ट्राची उद्योगमंत्री पदाची जबाबदारी आहे, म्हणून ते गडचिरोलीपासून ते रत्नागिरीच्या टोका पर्यंत उद्योगांची साखळी उभारण्यात आणि मंजूरी मिळविण्यात यशस्वी झालेत.
त्यांचा निवडणूक पूर्व कार्य अहवाल ‘उदयपर्व’ यात त्यांच्या नेतृत्त्व, कर्त्तृत्व, वर्त्तृत्व, आणि प्रगतीच्या दिशा याचा आढावा आलेला आहे. या व्यक्तिमत्वाबद्दल मी पाचव्यांदा लिहीत आहे. कारण गेल्या ४५ वर्षाच्या काळात रत्नागिरीने जी प्रगतीची वाट सुकर केली आहे. त्यातले बरेचसे कार्य या उदय सामंतांच्या पाच टर्म मध्येच घडले आहे. सहाव्या टर्मच्या विजयाची ही नांदीही असू शकते. कारण मानवी संबंध आणि प्रेमभावाचा दुवा पक्षविरहीत सांभाळावा लागतो. त्यात त्या त्या भागातील प्रगतीचा ‘सांधा’ चांगल्यारितीने साधला जात असतो. राजकारणाचा हा माझ्या मते एक महत्वाचा पाया आहे. हे सामंत त्यात नक्कीच यशस्वी ठरले आहे.
निसर्ग जपून, शेती सांभाळून, बागायतीला विस्तारून पर्यावरणपूरक आणि प्रदूषणरहीत उद्योग उभारणीत त्यांच्या दूरदृष्टीचा महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशाला फायदाच होईल.
महाराष्ट्रीय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला. जगभर ही मधुर भाषा कुठे ना कुठे बोलली जाते. विदर्भाततील उंढार, पश्चिम महाराष्ट्रातील लावणी, कोकणातील नमन खेळे इत्यादी आणि संतांच्या वाङमयातून ही मराठी बोली अस्मिता टिकवून आहे. माझं स्पष्ट मत आहे. त्या त्या राज्यातील राज्य भाषा, हिंदी भाषा आणि आंग्ल भाषा हया तीनही सक्तीच्या असाव्यात. कारण भाषा हे संवादासाठी असतात. इथेही मराठीचं अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांना कार्य करावे लागणार आहे. त्यासाठी तालुका स्तरावर विविध उपक्रम राबविले जातील असे त्यांनी नुकत्याच त्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
त्यांच्या हया वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी माझा हा लेख प्रपंच. त्यांच्या मार्फत खूप कार्य घडो. त्यांना यश मिळो, हीच शुभेच्छा!
लेखक
(डॉ. दिलीप पाखरे)
निरिक्षक, अभ्यासक, आरोग्य,
साहित्य आणि सांस्कृतिक कार्यकर्ता आहेत