चिपळूण शहरात वाढीव घरपट्टीविरोधात दोन हजार हरकती दाखल.
वाढीव घरपट्टीबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी नागरिकांना दि. २८ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार हरकती नोंदविण्यासाठी चिपळूण नगर पालिकेच्या नागरिकांची झुंबड उडत आहे. आतापर्यंत दोन हजार मालमत्ताधारकांनी या वाढीव घरपट्टीविरोधात लेखी हरकती नोंदविल्या आहेत.चिपळूण नगर पालिकेने ३१ हजार ७७३ मालमत्तांपैकी १८ हजार ८६४ मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्या आहेत. कोणतीही करवाढ केलेली नाही.
नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम, झोनबद्दल यापूर्वी मालमत्ता कर यादीत नावे नसणे, भाड्याने देणे, या कारणास्तव त्यांच्या करात वाढ झाली आहे. ज्यांना यावर आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी दि. २८ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवाव्यात, असे नगर पालिका प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केले होते.www.konkantoday.com