आयटीआय संगमेश्वर येथील पदभरती रद्द.
रत्नागिरी दि.26 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर या संस्थेत गणित व चित्रकला निदेशक हे एक पद तासिका तत्वावर निव्वळ तात्त्पुरत्या स्वरुपात भरण्याकरीता 30 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याबाबतची बातमी वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात आली होती. तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे सदरची तासिका तत्वावरील निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची पदभरती रद्द करण्यात येत आहे. संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर यांनी कळविले आहे.