
खेड-घेरापालगड येथे अनिल आत्माराम सुर्वे यांचे कौलारू घर आगीत जळून खाक
खेड तालुक्यातील घेरापालगड येथील अनिल आत्माराम सुर्वे यांचे कौलारू घर आगीत जळून खाक झाले. मंगळवारी रात्रौ १० च्या सुमारास ही घटना घडली. तब्बल ४ तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीत लाखोंची हानी झाली असून म्हैसही गंभीररित्या भाजली आहे. आगीमुळे सुर्वे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.तालुक्यात एकीकडे वणवे लागण्याचे प्रकार वाढले असतानाच घरांनाही आगी लागण्याचे सत्र सुरू झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. www.konkantoday.com