राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाच राज्यांच्या नवीन राज्यपालांची नियुक्ती केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी पाच राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर माजी लष्कर प्रमुख व्ही.के. सिंग यांना मिझोरामच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाच राज्यांच्या नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यात मणिपूर, मिझोराम, केरळ, बिहार आणि ओडिसा या राज्यांचा समावेश आहे.माजी लष्कर प्रमुख जनरल विजय कुमार सिंह यांना मिझोरामच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर केरळचे विद्यमान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे.
मणिपूरच्या राज्यपालपदी माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची नियुक्तीकरण्यात आली आहे.दरम्यान, छत्तीगडचे भाजपा नेता आणि ओडिसाचे विद्यमान राज्यपाल रघुबर दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती मुर्मू यांनी दास यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यानंतर मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभमपति यांची ओडिशाचे राज्यपाल म्हणून बदली करण्यात आली आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना केरळचे राज्यपालपद देण्यात आले आहे. तर केरळचे विद्यमान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना बिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अजय कुमार भल्ला यांना मणिपूरचे राज्यपाल म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.