राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात, 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या.
मंत्रिमंडळ खातेवाटप झाल्यानंतर राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाकडून करण्यात आल्या आहेत. दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी अनिल डिग्गीकर यांची बदली करण्यात आलेली आहे तर बेस्टमध्ये खांदेपालट करताना नवे महाव्यवस्थापक हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आलेली आहे.
महाजेनकोचे अध्यक्ष अनबाल्गन यांच्याकडे आता उद्योग विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याकडे कडे नागपूर टेक्सटाईल आयुक्त पदाची धुरा असणार आहे तर आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली झालेली आहे तर राज्य कर सहआयुक्त सी वनमाती यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सा वनमाती यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ संजय पवार यांची वर्णी लागलेली आहे.
विवेक जोन्सन हे चंद्रपूरचे नवे जिल्हा परिषद सीईओ असणार आहेत.पुणे विभागीय महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली करण्यात आलेली असून गोपीचंद कदम यांना सोलापूर स्मार्ट सिटी सीईओपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.