मुंबई -गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
कोलाड २५:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजापेठेत आज (बुधवार) दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी नाताळच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्याकडे जाण्यासाठी चाकरमान्यांनी पहाटे ६.०० वाजल्यापासून महामार्गावर गर्दी केली.यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या. यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून मार्ग काढतांना प्रवाशांची तारांबळ उडाली असल्याचे चित्र पाहवयास मिळाले.
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड (आंबेवाडी) बाजारपेठेत चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. तयामुळे येथील वाहतूक बाय पास रस्त्यावरून वळविण्यात आली. परंतु नाताळची सुट्टी असल्यामुळे असंख्य चाकरमानी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी टुव्हीलर, फोर व्हिलर, एसटीबस, प्रायव्हेट बस तसेच मिळेल त्या इतर वाहनाने गोव्याकडे निघाले आहेत. यामध्ये भरीतभर म्हणून अपुऱ्या रस्त्यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या असुन यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीत प्रवासी वर्ग त्रस्त झाले असल्याचे दिसून आले.