निवृत्तीनंतर आपण छंद जोपासा, गप्पा मारा, समाजसेवा, रुग्णसेवा करा-पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी.

आपण अधिकारी असलो तरी सेवानिवृत्त कर्मचारी आहोत, त्यामुळे आपल्या सर्व समान आहोत, अशी भावना ठेवा. आपला गणवेश, पदाची झालर दूर ठेवल्यास आपण सर्वांशी मिळून मिसळून जगू शकतो.आपण प्रथम माणूस आहोत, हे लक्षात ठेवले पाहिजे. पोलिस अधीक्षक कार्यालय २४ तास खुले आहे. आपण कधी या. निवृत्तीनंतर आपण छंद जोपासा, गप्पा मारा, समाजसेवा, रुग्णसेवा करा, असे आवाहन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

चांगले सहकारी शोधा. संध्याकाळची कंपनी नको. मॉर्निंग वॉक करणारे, लोकांची सेवा करणारे भजन, पूजन करणारे समूह शोधा. त्यात सक्रिय राहा. त्यासाठी हा मेळावा आवश्यक आहे. हे सर्व सहकारी चांगले आहे, संघटन मजबूत करा, असे आवाहनही धनंजय कुलकर्णी यांनी केले. मी संघटनेच्या सभासदांना नेहमी भेटत असतो, ही संघटना चांगले काम करत आहे, असे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.स्वयंवर मंगल कार्यालयात निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या पंचवार्षिक स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्यास कार्याध्यक्ष सुखानंद साब्दे, जनसंपर्क अधिकारी श्रीराम गोरे, डॉ. अलिमियॉं परकार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर सावंत, असोसिएशनचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वसंतराव चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी भागोजी आवटी, नवी मुंबई अध्यक्ष विनोद चव्हाण, मुंबईचे मुख्य सचिव विजय चव्हाण, रत्नागिरीचे मुख्य सल्लागार अरविंद सावंत, सिंधुदुर्गचे सचिव गोविंद वारंग, कार्याध्यक्ष अर्जुन राणे, पुणे माजी उपायुक्त श्री. राजहंस, सचिव शिरीष सासणे उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष अर्जुन राणे यांनी केले. कार्यक्रमाला मदत करणारे नॅशनल मेडिकल्सचे श्री. जैन यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button