
झेप 2024: महाराजा इव्हेंट मॅनेजमेंट करंडकावर नृत्य विभागाची विजयाची मोहर
रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या “झेप 2024” या सांस्कृतिक महोत्सवात महाराज करंडक जिंकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अतिशय रोमांचक आणि उत्साहवर्धक सादरीकरणे केली. इव्हेंट मॅनेजमेंटचे कौशल्य विकसित होण्यासाठी गेली 19 वर्षे हा करंडक सुरू आहे.खातू नाट्य मंदिर मध्ये जवळजवळ 2000 प्रेक्षकांसमोर मॅनेजमेंट ची कौशल्य सादर करताना स्पर्धेच्या निकालांनी सर्वांच्या उत्सुकतेचा कळस गाठला.
स्पर्धेतील अंतिम मानकरी:🔸 तिसरा क्रमांक: संगीत विभागाने आपल्या सुमधुर आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली.
दुसरा क्रमांक: फॅशन विभागाने स्टाईल, आत्मविश्वास, आणि क्रिएटिव्हिटीच्या जोरावर दुसऱ्या क्रमांकावर आपला ठसा उमटवला.
🔸 पहिला क्रमांक: महाराज करंडकाचा बहुमान नृत्य विभागाने पटकावला! सोलो, गट नृत्य, लोकनृत्य, आणि वेस्टर्न डान्सच्या धमाकेदार सादरीकरणाने प्रेक्षकांना थक्क केले. शिस्त आणि उत्कृष्ठ कलेची सादरीकरण यांचा संगम असलेल्या कार्यक्रमाने महाराजा करंडक पडकवला.गायत्री मांगले आणि टीम ने खूप मेहनत घेतली होती.
झेप 2024 चा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ देत, महाविद्यालयासाठी आणि रत्नागिरीसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे. नृत्य विभागाने जिंकलेला हा करंडक त्यांच्या जिद्दीचा आणि मेहनतीचा परिपाक आहे.”झेप 2024″ ने रत्नागिरीच्या सांस्कृतिक वारशाला नवी ओळख दिली! 1995 चे माजी विद्यार्थी डॉ.आनंद आंबेकर ऍड.सुजित कीर , बिपीन शिवलकर, प्रशांत बापार्डेकर , राजेश जाधव , संदेश कीर, हेमंत मांडवकर, सतीश नाईक, दैवत कडगावे, राजेश घाग, सचिन सावंत हे सर्वजण महाविद्यालयामध्ये असताना एन एन एस , एन सी सी आणि सांस्कृतिक विभागामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला कायमच प्रतिनिधित्व केले होते.आजी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावेत म्हणून 19 वर्षापूर्वी इव्हेंट मॅनेजमेंट चा करंडक सुरू केला आहे.
“झेप 2024” चा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीक प्रतिभेला वाव देणारा व सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.झेप महोत्सव समन्वयक डॉ आनंद आंबेकर आणि प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी खुप मेहनत घेतली आहे. विद्यार्थी सचिव मिहिका केनवडेकर , सांस्कृतिक प्रतिनिधी स्वराज साळुंखे आणि कोअर कमिटी आणि विद्यार्थी मंडळ खुप मेहनत घेतली आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन , कार्यवाह श्री.सतीश शेवडे ,सह कार्यवाह प्रा.श्रीकांत दुदगिकर, प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई,उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.चित्रा गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.सीमा कदम यांनी सर्व विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.