सिनेसृष्टीवर शोककळा! श्याम बेनेगल यांचे निधन, वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..
अंकूर, निशांत, मंडी, मंथन यासारखे गंभीर विषय असोत की वेलकम टू सज्जनपूर, वेल डन अब्बा असे हलकेफुलके कथानक… दोन्हीही तितक्याच समर्थपणे हाताळताना समांतर चित्रपट मुख्य प्रवाहातही लोकप्रिय करणारे प्रयोगशील दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे सोमवारी निधन झाले.ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले बेनेगल यांच्यावर मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी निरा आणि मुलगी पिया असा परिवार आहे. बेनेगल यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.