शासकीय औ. प्र. संस्था संगमेश्वर संस्थेत निदेशक पदासाठी ३० डिसेंबरपर्यंत अर्ज करा
रत्नागिरी, दि. 24 शासकीय औ. प्र. संस्था संगमेश्वर या संस्थेत गणित व चित्रकला निदेशक हे एक पद तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरावयाचे असून, त्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वरचे प्राचार्य र. वि. कोकरे यांनी केले आहे.
या पदासाठी डीव्हीईटीच्या मानकानुसार महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ११/०७/२०२४ रोजीच्या राजपत्रातील शैक्षणिक अर्हता अभियांत्रिकी किंवा तंत्रशास्त्र या मधील यंत्र अभियांत्रिकी विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदविका असणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक तो अनुभव असावा. वरील पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर रामपेठ सप्तेश्वर रोड, संगमेश्वर यांच्याकडे कागदपत्रे व अनुभवाच्या दाखल्यासह ३० डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत.
दि. २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अर्ज सादर करणाऱ्यांच्या मुलाखती व व्यावसायिक चाचणी होतील व त्याच दिवशी निवड झालेल्या उमेदवाराला नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.000