
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 27 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन
रत्नागिरी दि. 24 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी या संस्थेत 27 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.या तंत्रप्रदर्शन मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व व्यवसायातिल प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे.
तरी या कालावधील रत्नागिरी शहरातील सर्व शाळा तसेच कॉलेज यांनी सकाळी 11 ते दुपारी 2 वा. या वेळेत तंत्रप्रदर्शन लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी गटनिदेशक सी.आर .शिंदे मो.क्र. ९९६७७७५३१७, गटनिदेशक पी.जी.कांबळे ९४२३८७६८८३ यांच्याशी संपर्क साधावा.000