
राज्यात दहा एमबीबीएस महाविद्यालयांना मान्यता – मंत्री हसन मुश्रीफ.
कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयांसह रुग्णालयांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.मंत्री मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खाते मिळाल्यानंतर ते बोलत हाेते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, मागील सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण खाते माझ्याकडे होते.
पण केवळ तेरा महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी अद्ययावत ११०० बेडचे रुग्णालय, बीएचएमएस, बीएएमएस, योगाचे महाविद्यालय मंजूर करून आणले आहे. ही सर्व कामे पूर्णत्वाकडे न्यायची आहेत. त्याचबरोबर राज्यात दहा ते अकरा एमबीबीएस शासकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. त्याचीही तयारी करायची आहे. आगामी काळात काळ मर्यादा निश्चित करून ही कामे पूर्ण करण्याचा मानस आहे.