नवजात शिशू रूग्णवाहिकेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण
रत्नागिरी, दि. २४ – सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रग्णालयामार्फत नवजात शिशू रुग्णवाहिका, कर्करोग निदान उपकरणे व परिचारिका प्रशिक्षण वाहन लोकार्पण सोहळा उद्या बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, उद्योगमंत्री उदय सामंत व गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास’ व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ भास्कर जगताप यांनी दिली.*
खासदार सुनिल तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार अॕड निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार अनिकेत तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
विशेष निमंत्रित म्हणून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ .दिलीप माने हे उपस्थित राहणार आहेत.