देवरूख शहरातील मार्लेश्वर पेट्रोल पंपासमोरील हॉटेलला आग, दोन लाखांचे नुकसान.
देवरूख शहरातील मार्लेश्वर पेट्रोल पंपासमोरील सोळजाई हॉटेलला आग लागून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झघले. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. स्थानिकांचे प्रसंगावधान आणि देवरूख नगरपंचायतीचा अग्निशमन बंब यामुळे आग आटोक्यात आली. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.सुयश शिंदे हे हॉटेल चालवित होते. गेले दोन दिवस हॉटेल बंद होते. देवरूख-साखरपा या मुख्य मार्गालगत हे हॉटेल आहे.
शनिवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास मार्गावरून प्रवास करणार्या नागरिकांना हॉटेलमधून धूर तसेच आगीच्या ज्वाळा दिसून आल्या.यावेळेस दत्तनगर येथे कबड्डी स्पर्धा सुरू होती. तेथील तरूणांना याबाबतची कल्पना देताच मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक तात्काळ मदतकार्यासाठी घटनास्थळी धावून गेले. देवरूख नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.www.konkantoday.com