दीपक केसरकरांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयात बदल, गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
शिवसेना नेते आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना यंदा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्याने ते काहीसे नाराज झाले आहेत. विध्यार्त्यांच्या शालेय गणवेश योजनेचा निर्णय दीपक केसरकर यांनी घेतला होता. त्यात आता बदल होणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले आहे. त्यावरून केसरकर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. हा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी चर्चा तरी करायला हवी होती असं त्यांनी म्हंटल होत. आता दीपक केसरकर यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयात बदल करण्यात येणार असं समोर आले आहे.२१ डिसेंबरला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. शालेय शिक्षणमंत्रीपदाचा पदभार दादा भुसे यांच्याकडे देण्यात आला आहे. या आधी दीपक केसरकर यांच्याकडे होता. दीपक केसरकर यांनी विध्यार्त्यांच्या शालेय गणवेश योजनेचा निर्णय घेतला होता. या निर्णयात बदल होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्यात आलेल्या निर्णयावर राज्य सरकारकडून फेरविचार सुरू असल्याची माहिती आहे.सन २०२३ – २०२४ या शैक्षणिक वर्षांपासून पुस्तकाला वह्याची पाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जेणेकरून दप्तराचे ओझे कमी होईल, या शिवाय शिक्षकांकडून वर्गात शिकवलं जात असतांना विद्यार्थ्यांकडून वह्यांमध्येच याच्या नोंदी घेतल्या जातील, असा उद्देश त्यावेळी सांगण्यात आला होता. आता पुस्तकाला वह्याचीपाने जोडणाऱ्या निर्णय रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.