
दामले विद्यालयाच्या एक बरोबर शून्य बालनाट्याने रसिकांची मने जिंकली.
पुणे येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय बालनाट्य महोत्सवात रत्नागिरी शहरातील दामले विद्यालय, नगर परिषद शाळा क्रमांक १५ ने सादर केलेल्य दहा वजा एक बरोबर शून्य या बालनाट्याने रसिकांची मने जिंकली.बालरंगभूमी परिषद २० ते २२ डिसेंबर या कालावधीत हे संमेलन आयोजित केले होते. अण्णाभाऊ साठे ऑडोटोरियम, बिबवेवाडी, पुणे येथील सुधाताई करमरकर मुख्य रंगमंचावर शिक्षक योगेश कदम लिखित व शाहबाज गोलंदाज दिग्दर्शित दहा वजा एक बरोबर शून्य या बालनाट्याचा निमंत्रित संघ म्हणून प्रयोग सादर झाला.
बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेने राज्यस्तरावर प्रथमच अशा बालनाट्यसंमेलनाचे आयोजन केले होते.कमी पटसंख्येअभावी बंद पडत जाणारी मराठी शाळा वाचवण्यासाठी धडपडणार्या बालदोस्तांचा आणि त्यांच्या गुरूजींचा प्रवास या बालनाट्यातून मांडण्यात आला आहे.यापूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईने आयोजित केलेल्या बालनाट्य स्पर्धेत याच बालनाट्याने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला होता. यावर्षी झालेल्या पहिल्या बालनाट्य संमेलनात दामले विद्यालयाला निमंत्रित करण्यात आले होते.www.konkantoday.com