दापोली तालुक्यातील लाडघर येथे बैल उधळल्याने मुले किरकोळ जखमी.
दापोली तालुक्यातील लाडघर येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शर्यत संपल्यानंतर बैलगाडी मालकाच्या घराकडे नेत असताना अचानक बैल उधळल्याने दुचाकी व गाडीत बसलेली मुले खाली पडल्याने किरकोळ जखमी झाल्याचे समोर आले. लाडघर येथे बैलगाडी शर्यत पार पडली.
त्यानंतर गाडी लाडघर येथील मालकाच्या घरी जाण्यास निघाल्यानंतर अचानक बैल उधळले. यावेळी गाडीत बसलेली मुले खाली पडली. व जखमी झाली. तर तिथेच असणार्या दुचाकीचा देखील बैलगाडीची धडक बसल्याने नुकसान झाले.www.konkantoday.com