खेळताना दुखापत झालेल्या कबड्डीपट्टू आडविरकरचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू; क्रीडाप्रेमींतून हळहळ.

पूर्णगड येथील एक उत्कृष्ट आणि नावाजलेला कबड्डीपटू मानस आडविरकर याचे सामना खेळताना झालेल्या अपघातानंतर मृत्यू झाला. या अपघातामध्ये त्याच्या मानेला दुखापत झाली होती.अधिक उपचारासाठी त्याला आधी कोल्हापूर आणि नंतर मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले. कबड्डीमध्ये जिल्हाभरात त्याने नावलौकिक मिळविला होता. त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात तसेच क्रीडा प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.

मानस यशवंत आडविरकर (वय २५, रा. पूर्णगड) असे त्या कबड्डीपट्टूचे नाव आहे. तो अनेक संघातून कबड्डी खेळत असे. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे पाटीलवाडी येथील झुंजार संघ व कालिका संघ या दोन संघातून तो कबड्डी खेळत होता.२ डिसेंबरला हा सामना मिरजोळे येथील स्पर्धेतील सामन्यात खेळताना त्याच्या मानेच्या खालील भागाला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले, परंतु त्या ठिकाणी आवश्यक ते उपचार होऊ शकले नाही.

त्याला पुन्हा रत्नागिरीला आणून पुढीलउपचारासाठी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील जे. जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.परंतु गंभीर दुखापतीमुळे उपचार घेत असताना रविवारी (ता. २२) सायंकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. सोमवारी (ता. २३) सकाळी पूर्णगड येथील स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तो कुटुंबात एकुलता एक मुलगा होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button