किनारपट्टीचा विकास, संरक्षणाला महत्व देणार, मत्स्य, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन.
कोकणातील आंबा, काजू, सुपारी, मास यावर मोठे अर्थकारण अवलंबून आहे. हे सर्व विचारात घेवून किनारपट्टीवर असलेल्यांना एकत्र येवून विकास करायचा आहे. हे खातं सांभाळताना किनारपट्टीचा विकास व संरक्षण या दोन्हीचा विचार मला करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बारकाईने विचार करून मला या महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिली आहे. या दोन्ही खात्यांमुळे दरडोई उत्पन्न वाढविण्याची संधी मला आहे. माझ्या खात्याचा वापर करून कोकण, महाराष्ट्रासाठी त्याचा लाभ करून देणार असे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे हा माझा प्रश्न नाही. वरिष्ठ देणार ती जबाबदारी मला पार पाडायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राणे यांचे प्रथमच जिल्ह्यात आगमन झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, सर्वांना एकत्र घेवून सिंधुदुर्ग, कोकणचा विकास करायचा आहे.www.konkantoday.com