अपघाताप्रकरणी चिपळुणात महिला कारचालकावर गुन्हा दाखल
रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने यामुळेच कार १५ फूट खोल खड्ड्यात जावून कोसळण्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यात असुर्डे येथे शनिवारी घडली होती. या अपघातप्रकरणी एका महिला कारचालकावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद प्रज्वल भूषण मालवणकर (२६, नवी मुंबई) याने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला कारचालक कारने मुंबई ते गणपतीपुळे अशी मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करत होती. असे असताना तालुक्यातील असुर्डे या ठिकाणी आल्यावेळी रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कार रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या १५ फूट खोल खड्ड्यात जावून पडली. यात तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी त्या महिला कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com