
दीपावली सुट्टीसाठी चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमूच्या २६ पर्यंत फेर्या
दीपावली सुट्टीसाठी ३ ऑक्टोबरपासून चालवण्यात येत असलेल्या चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू स्पेशल फेर्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. स्पेशलच्या २६ ऑक्टोबरपर्यंत फेर्या आहेत.
०११६०/०११५९ क्रमांकाची चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू स्पेशल दर शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी धावत. आहे. चिपळूण येथून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी मेमू त्याचदिवशी संध्याकाळी ४.३० वाजता पनवेल येथे पोहचते.
www.konkantoday.com




