पुण्यात डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याचा हृदयद्रावक प्रकार.
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील वाघोलीतील अपघातासंदर्भात ही बातमी आहे. वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ पुण्याकडून येणाऱ्या बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या भरधाव डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याचा हृदयद्रावक प्रकार घडला आहे.या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बालकांचा समावेश आहे. तर सहाजण गंभीर जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
धक्कादायक असा हा प्रकार मध्य रात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास घडला आहे. दरम्यान, या घटनेतील डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता.याबाबात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केसनंद फाट्यावरील फूटपाथवर 12 लोकं झोपलेले होते. दरम्यान, झोपलेल्या लोकांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. फूटपाथवर एकूण 12 जण झोपले होते. तर बाकी फूटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकाचे भरधाव डंपरील नियंत्रण सुटल्याने तो सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्या लोकांच्या अंगावर गेला