
ना. योगेश कदम यांचे खेडमध्ये जल्लोषात स्वागत.
कोकणचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. उद्योग मंत्री, आरोग्य जलसंधारण तसेच गृहराज्यमंत्री अशी पदे शिवसेनेकडे आहेत.त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास केला जाईल, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेडमध्ये आगमन होताच दिली.दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर तसेच त्यांना गृहराज्यमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते त्यांच्या मतदारसंघातील खेडमध्ये आले.
कशेडी येथून 200 गाड्यांच्या ताफ्यासह ते भरणे येथील ग्रामदैवत श्री. काळकाई देवीचे दर्शन घेतले.नंतर त्यांनी भरणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला. तेथून त्यांनी भरणे येथील शिवसेना कार्यालयाला भेट दिली. त्याठिकाणी तालुकाप्रमुख सचिन धाडवे व शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पुढे शिवाजी चौक येथे लेझीम आणि झांज पथकाने त्यांचे स्वागत केले.