
नाचणे येथील तरुणाला तिघांकडून तीन लाखांचा चुना
रत्नागिरी शहरानजीकच्या नाचणे परिसरातील तरुणाला मुंबईमधील तीन जणांनी तब्बल 3 लाख रुपयांचा ऑनलाईन चुना लावला. ही घटना 24 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडली आहे. अजय (पूर्ण नाव गाव माहित नाही) एक महिला आणि रोशन अन्सारी (सर्व रा.मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात प्रशांत पर्शुराम मुळ्ये (34,रा.शांतीनगर रसाळवाडी नाचणे,रत्नागिरी) यांनी शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, या तिन संशयितांनी फिर्यादीच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या बँक खात्यातील 2 लाख 95 हजार काढून घेत त्यांची फसवणूक केली.