
चिपळुणात घरपट्टीवाढीबाबत आक्षेपानंतर फेरसर्वेक्षणाला सुरूवात.
चिपळूण येथील घरपट्टीवाढीबाबत आक्षेप येत असल्याने नगर परिषदेने फेरसर्व्हेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत १५० जणांची प्रत्यक्ष तपासणी झाली असून त्यात ७५ जणांच्या आक्षेपात तथ्य नसल्याचे उघड झाले आहे तर उर्वरित ७५ जणांच्या तपासणीदरम्यान काही तांत्रिक बाबी निर्माण झाल्याने सुनावणीनंतर त्यांच्या कराबाबत निर्णय होणार आहे. एकंदरीत सुरू असलेल्या फेरसर्व्हेक्षणात उघड होणार्या बाबी लक्षात घेत राजकीय ओरड निरर्थक ठरण्याची शक्यता आहे.२ वर्षापूर्वी नगर परिषदेने एका एजन्सीच्या माध्यमातून शहरातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण केले होते.
त्यानुसार ३३१ हजार ७७३ मालमत्तांपैकी १८ हजार ८६४ मालमत्तांना नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम, झोन बदल, यापूर्वी मालमत्ता कर यादीत नावे नसणे, भाड्याने देणे या कारणास्तव करात वाढ झाली आहे. यातील अनेकांना ही वाढ मान्य असली तरी काहीजण राजकीय आसरा घेवून त्या विरोधात रणकंदन माजवत आहेत.www.konkantoday.com