वायूगळतीच्या चौकशी समितीचा अहवाल पुढच्या आठवड्यात मिळणार.
जवळस असलेल्या गॅस प्लांटमधून वायूगळती झाल्याने जयगड विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयातील ७० पेक्षा जास्त मुलं बाधित झाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी चौकशी समिती स्थापन करून समितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या चौकशी समितीचा अहवाल पुढील काही दिवसात सादर केला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी सांगितले.www.konkantoday.com