रत्नागिरी शहरातील सन्मित्रनगर येथील दुर्गासुमन इमारतीमध्ये शार्टसर्किटमुळे इमारतीला आग.
रत्नागिरी शहरातील सन्मित्रनगर येथील दुर्गासुमन इमारतीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये इमारतीचे वायरींग जळून खाक झाले. तसेच तेथील वस्तूंचेही नुकसान झाले. रत्नागिरी नगर परिषद व एमआयडीसी अग्निशमन दलाने शर्थीने प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.सन्मित्रनगर येथील दुर्गासुमन इमारतीमध्ये १९ डिसेंबर रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीमुळे संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला होता.
यावेळी इमारतीमधील रहिवाशांनी तातडीने रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच आग वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच एमआयडीसीच्या अग्निशमन दलालाही येथे पाचारण करण्यात आले. तासाभराच्या प्रयत्नानंतर नगर परिषदेच्या कर्मचार्यांना आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही महत्वाची कामगिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील वाहनचालक नरेश सुर्वे, फायरमन नरेश मोहिते, शिवम शिवलकर, रोहन गझने, अनिश तोडणकर यांनी पार पाडली.www.konkantoday.com