रत्नदुर्गवरील व्यसनाधीन प्रवृत्तींना आळा घालण्याची जिल्हाधिकार्यांकडे मागणी.
रत्नदुर्ग किल्यावर होत असलेली अश्लील कृत्ये, मद्यपान व प्रेमीयुगुलांच्या रात्री-अपरात्रीच्या फेर्यांमुळे किल्ल्याच्या पवित्र वास्तूला अपमानीत करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. या प्रकारास आळा घालण्यासाठी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांच्याकडे उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी गडसंवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले व सविस्तर चर्चेसाठी लवकरच पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासनही दिले.
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने जिल्हाधिकार्यांची भेट घेण्यात आली. या भेटीत रत्नदुर्ग किल्ल्यावर चालणार्या या प्रकाराबाबत चर्चा करण्यात आली. किल्ल्याच्या पवित्र वास्तूत घडत असलेल्या अश्लील व व्यसनाधीन प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी नियमित पोलीस गस्त व दोषींवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.www.konkantoday.com