
माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचा जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना पत्र
रत्नागिरीतील वायुप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर: एअर क्वालिटी मॉनिटर्स आणि MPCB ची जबाबदारी स्पष्ट करण्याची मागणी
दिनांक: २१ डिसेंबर २०२४, रत्नागिरी, महाराष्ट्र.रत्नागिरी शहरात वायुप्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. साळवी स्टॉप आणि जे.के. फाईल कंपनी परिसरात रात्री धूर आणि गॅसच्या वासाने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनांमुळे शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले असून, वायुगुणवत्तेची (AQI) स्थिती अधिकाधिक बिघडत असल्याची चिन्हे आहेत.
माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि स्थानिक प्रशासनाला एअर क्वालिटी मॉनिटर्सच्या स्थितीबाबत सार्वजनिक अहवाल जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, रत्नागिरीतील वायुगुणवत्तेच्या बिगडत्या परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्याची जबाबदारी MPCB वर आहे.मुख्य मुद्दे:1️⃣ वायुगुणवत्तेचे मॉनिटरिंग:रत्नागिरी शहरात किती एअर क्वालिटी मॉनिटर्स बसवले आहेत, ते कार्यरत आहेत की नाही, याचा तपशील नागरिकांना मिळायला हवा. तसेच, AQI मॉनिटरिंगची आकडेवारी सार्वजनिक केली जावी.
डिस्प्ले बोर्डची अनुपस्थिती:वायुप्रदूषणाचे आकडे नागरिकांसाठी सुलभ व्हावेत यासाठी AQI डिस्प्ले बोर्ड लावणे आवश्यक आहे. अशा डिस्प्ले बोर्डची उभारणी अद्याप का झाली नाही, यावर MPCB ला उत्तर देणे भाग आहे.3️⃣ AQI ची खालावलेली स्थिती:गेल्या काही महिन्यांत रत्नागिरीतील AQI झपाट्याने बिघडत चालला आहे. औद्योगिक वायुगळती आणि बेकायदेशीर कचरा जाळणे यामुळे पर्यावरणीय हानी होत आहे.मिलिंद कीर यांचे मत:“एमपीसीबी आणि स्थानिक प्रशासन यांची जबाबदारी आहे की, शहरातील वायुप्रदूषणाची स्थिती नागरिकांसमोर मांडावी. AQI मॉनिटर्स कार्यरत आहेत की नाही, याची खात्री होणे आवश्यक आहे. नागरीकांच्या आरोग्यासाठी ही प्राथमिकता असायला हवी,” असे त्यांनी म्हटले.