बंदर विभागाला गतवर्षात ११६ कोटींचा महसूल.
रत्नागिरी जिल्ह्यात बंदर विभागाने गेल्या तीन वर्षात चढत्या क्रमाने उत्तम कामगिरी केली आहे. आयात-निर्यात क्षेत्रात झालेली वाढ आणि त्यानिमित्ताने बंदरांचा वाढता वापर रत्नागिरी जिल्ह्यात नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात शुल्कापोटी तब्बल ११६ कोटी रूपये बंदर विभागाला मिळाले आहेत.रत्नागिरी येथील प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ यांनी सांगितले की, २०२१-२२ या आर्थिक वर्षात ९९ कोटी २६ लाख रुपये बंदर विभागाला महसूल म्हणून प्राप्त झाला. यानंतरच्या वर्षी २०२२-२३ ला १०६ कोटी ७ लाख रुपये एवढा महसूल प्राप्त झाला. अलिकडेच संपलेल्या आर्थिक वर्षात २०२३-२४ साली ११५ कोटी ७२ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला.www.konkantoday.com