
आमदार योगेशदादा कदम यांची महाराष्ट्र राज्याच्या गृहराज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा उद्या दापोलीत जाहीर नागरी सत्कार
दापोली २२:- दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेशदादा रामदास कदम यांची महाराष्ट्र राज्याच्या गृहराज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल तर 49 वर्षानंतर दापोलीला राज्यमंत्रीपद आमदार योगेश कदम यांना मीळाल्याबद्दल त्यांचे सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता दापोलीत आगमन होणार आहे. त्यांचे भव्य स्वागत व दापोली च्या वतीने जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेना दापोली तालुकाप्रमुख श्री उमेश राजे यांनी दिली आहे.