
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी पुलावर कंटेनरचा अपघात टळला
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्या कंटेनरचा अपघात टळला. हा कंटेनर जगबुडी नदीपात्रात कोसळण्याच्या स्थितीत होता.या अपघाताची माहिती मिळताच खेड मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, रूपेश पवार, प्रतिक पाटणे, विलास पाटणे आदी तातडीने घटनास्थळी पोहचले. अपघातग्रस्त कंटेनर भरणे येथील जगबुडी नदीपाात्रात कोसळण्याच्या स्थितीत असतानाच तातडीच्या मदतकार्यामुळे मोठा अपघात टळला. यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. www.konkantoday.com