
रत्नागिरी जिल्ह्यातील पीयूसी सेंटर्सकडून वाहनचालकांची लूट ,उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार
रत्नागिरी जिल्ह्यातील पीयूसी सेंटर्सकडून सध्या वाहनचालकांची लूट सुरू झाली आहे.काही ठिकाणी एका प्रमाणपत्रामागे कारमागे दीडशे रुपये घेतले जातात. प्रत्यक्षात पावती मात्र ९० रुपयांची दिली जात आहे. पीयूसी सर्टिफिकेटसाठी शासनाने ठरवलेल्या फीपेक्षा तब्बल चाळीस ते साठ रुपये जास्त घेतले जात आहेत; मात्र जास्तीचे आकारलेले पैसे कोणाकोणाच्या खिशात जातात आणि त्यासाठी वाहनचालकांना वेठीस का धरले जाते, असे सवाल येथील वाहनचालकांनी उपस्थित केला. या संदर्भात शहरातील पत्रकार मकरंद भागवत यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांच्याकडेच थेट तक्रार केली आहे.
www.konkantoday.com