
खेड येथे चोरीच्या उद्देशाने फिरणार्या तीनजणांविरूद्ध गुन्हा दाखल
खेड शहरातील युनिक मेडिकलसमोर एका बिल्डींगच्या आडोशाला संशयास्पदरितीने फिरत असताना पोलिसांनी एकनाथ पाटणे, भरत कदम, फिरोज जोगीलकर या तीन इसमांना ताब्यात घेतले आहे. खेड शहरातील पोलीस एसटी स्टँड, डाकबंगला तीनबत्ती नाका येथे पेट्रोलिंग करीत असताना सदरचे तीन इसम संशयितरित्या फिरताना आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यातील एका इसमाकडे पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे लोखंडी सळी मिळून आली त्यामुळे हे चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. www.konkantoday.com