वालावलकर रूग्णालयाचा बाह्यरूण विभाग सौरउर्जेने प्रकाशित होणार.

डेरवण (ता. चिपळूण) येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टने वालावलकर रूग्णालयाचा बाह्यरूण विभाग सौरउर्जेने प्रकाशित केला आहे. त्यामुळे या विभागातील सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, रेडिएशन युनिटस, बाह्यरूग्ण ओपीडी परिक्षणाचे काम सुलभ होणार आहे.येथील संस्थेच्या सामाजिक कार्याचा उद्देश जाणून लेग्रांड इंडिया लिमिटेड या कंपनीने पुढाकार घेवून १०० किलो वॅट एवढी उर्जा निर्मिती होईल, अशी सौरपॅनल देणगी म्हणून दिली.अवेस्ता सोलरचे मालक बर्गिस बलसारा यांच्या संपूर्ण सहकार्याने ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.

प्रदूषणमुक्त हरित संकुलाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत वालावलकर हॉस्पिटलच्या बाह्यरूग्ण इमारतीत सौरपॅनल बसविण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. या वेळी संस्थाचालक विकास वालावलकर उपस्थित होते. सौरउर्जा हा नाविण्यपूर्ण उपक्रम कोकणात प्रथमच होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button